New Delhi : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक

एमपीसी न्यूज- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. दरम्यान, वाजपेयी यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘एम्स’मध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक मंत्र्यांनी एम्समध्ये जावून वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. दरम्यान, वाजपेयी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी देशभरात विविध मंदिरातून प्रार्थना करण्यात येत आहे.

एम्स रुग्णालयाकडून आताच जारी केलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. पुढचे मेडिकल बुलेटिन संध्याकाळी सात वाजता जारी केले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.