Pune : विभागस्तरीय महिला लोकशाही दिनाचे 12 जून रोजी आयोजन

एमपीसी न्यूज – समस्याग्रस्त व पीडित महिलांच्या तक्रारींचे निवारण करुन त्यांना न्याय मिळावा यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. जून महिन्याचा महिला लोकशाही दिन 12 जून रोजी सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे, असे पुणे महिला (Pune) व बाल विकास विभागाचे उपआयुक्त संजय माने यांनी सांगितले.

Maharashtra News : अबब! मंत्रालयाला दर महिन्याला येतंय 35 लाखांचे वीजबिल

संजय माने म्हणाले, “विभागस्तरीय महिला लोकशाही दिनाचे तक्रार अर्ज विभागीय उप आयुक्त, महिला व बाल विकास, पोलीस आयुक्तालय शेजारी, 3, चर्च रोड, पुणे- 1 या पत्त्यावर स्विकारले जाणार आहेत. तक्रार अर्ज स्विकारल्यानंतर ज्या विभागाशी संबंधित तक्रार आहे त्या विभाग प्रमुखाकडे अर्ज पाठविण्यात येतील.

संबंधित विभागप्रमुख हे तक्रारीवर केलेल्या अहवालासह लोकशाही दिनाच्या दिवशी उपस्थित राहणार आहेत. अर्जदारास महिला लोकशाही दिनानंतर कमाल एक महिन्याच्या आत अंतिम उत्तरे दिली जाणार आहेत.

महिला लोकशाही दिनात अर्ज करण्यासाठी तक्रार, निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे असावे, तक्रार अर्ज दोन प्रतीत तसेच विहित नमुन्यात असावा. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेले, सेवा व आस्थापनाविषयक बाबी, तक्रार, निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असेही संजय माने यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.