Pimpri Chinchwad RTO : पक्क्या ड्रायव्हिंग लायसनसाठी मासिक दौऱ्याचे आयोजन

एमपीसी न्यूज – एप्रिल 2022 मध्ये पक्की ड्रायव्हिंग लायसन्स मिळण्याच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पक्क्या ड्रायव्हिंग लायसन्स चाचणीसाठी 4 आणि 5 एप्रिल रोजी खेड, 11 आणि 12 एप्रिल रोजी मंचर, 18 आणि 19 एप्रिल रोजी जुन्नर, 25 आणि 26 मार्च रोजी वडगाव मावळ आणि 29 मार्च रोजी लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पक्क्या ड्रायव्हिंग लायसन्ससाठी 1 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी पाच वाजता कोटा उपलब्ध होणार आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर अर्जदारांनी गर्दी टाळण्याच्यादृष्टीने पूर्वी (अपॉईंटमेंट) घेतलेल्या वेळेतच हजर राहावे, तसेच कोरोना विषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

पक्क्या ड्रायव्हिंग लायसन्ससाठी विशेष शिबिराचे आयोजन

पिंपरी-चिंचवड येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत पक्क्या अनुज्ञाप्तीसाठी ऑनलाईन पूर्ववेळ घेण्याचा (अपॉईंटमेंट) प्रतीक्षा कालावधी कमी करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांकरिता www.parivahan.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पूर्ववेळ घ्यावी लागणार आहे. 9 एप्रिल रोजी होणाऱ्या शिबिरासाठी 6 एप्रिल, 16 एप्रिल रोजी होणाऱ्या शिबिरासाठी 13 एप्रिल, 23 एप्रिल रोजी होणाऱ्या शिबिरासाठी 20 एप्रिल, 30 एप्रिल रोजी होणाऱ्या शिबिरासाठी 27 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता कोटा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अर्जदाराने पक्क्या अनुज्ञाप्तीसाठी वेळेत उपस्थित राहावे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी माहिती दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.