Chinchwad Crime News : इन्शुरन्स पॉलिसी काढून घेतल्याप्रकरणी फायनान्स कंपनीविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – इन्शुरन्स पॉलिसी काढून घेतल्याप्रकरणी आय.आय.एफ.एल फायनान्स प्रा. लि. कंपनी व कंपनीच्या क्रेडीट डिपार्टमेंटचे राहुल रमेश भोसले यांच्या विरोधात कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुलै 2018 रोजी चिंचवड येथे ही घटना घडली.

याप्रकरणी रुबल सतीश धुत (वय 28, रा. सहकारनगर, पुणे) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आय आय एफ एल या फायनान्स कंपनीने फिर्यादी, फिर्यादीचे वडील सतीश धूत, आई इंदू धूत, भाऊ शुभम धूत यांना कोंढवा येथील एक फ्लॅट घेण्यासाठी एक कोटी एक लाख 50 हजार रुपये कर्ज मंजूर केले. कर्ज घ्यायच्यावेळी फिर्यादी यांचे आयसीआयसी लोम्बार्ड आणि प्रुडेंशियल कंपनीचा इन्शुरन्स काढून देतो म्हणून कंपनीच्या इन्शुरन्स पेपरवर सह्या घेतल्या. या कंपनीचा इन्शुरन्स फिर्यादी यांना दिला नाही.

तसेच, टाटा ए आय जी कंपनीच्या इन्शुरन्सच्या पेपरवर फिर्यादी, त्यांचे वडील, आई आणि भाऊ यांच्या खोट्या सहया करून टाटा ए आय जी कंपनीचा इन्शुरन्स काठून फिर्यादी यांची फसवणूक केली. पाच ऑक्टोबर 2021 रोजी फिर्यादी यांच्या पत्त्यावर ए आय जी कंपनीने पोस्टाद्वारे पॉलिसी रद्द केल्याचे कागदपत्र पाठवले. पॉलिसी रद्द केलेल्या कागदपत्रांवर फिर्यादी व घरच्यांनी विनंती केल्याने पॉलिसी रद्द केली असे कारण होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.