Moshi Crime News : कृषी प्रदर्शनातून अॅपलचा लॅपटॉप व एअरपोड चोरीला, चोरीची दुसरी घटना

एमपीसी न्यूज – मोशी येथे किसानतर्फे आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनातून चोरीच्या घटना समोर येत आहेत. प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी एका इसमाचा आयफोन चोरीला गेल्याची तक्रार झाली. त्यानंतर आता अॅपलचा लॅपटॉप व एअरपोड चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. रविवारी (दि.27) सायंकाळी 5 ते 6 वा च्या दरम्यान ही घटना घडली.

शिवीत रविंद्रकुमार वोरा (वय 31, रा. पंजाब) यांनी याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावारून अज्ञात विरोधात भारतीय दंड विधान कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वोरा यांचा 70 हजार रुपयांचा लॅपटॉप, 15 हजार रुपयांचा एअरपोड एका बॅगमध्ये होता. ही बॅग ट्रॅक्टर स्टॉलच्या टेबलवर ठेवली होती. अज्ञात चोरट्याने ही बॅग चोरली आहे. असे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.