Sangavi Crime News : कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक, आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी 1 लाख 80 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रक्षक चौक, सांगवी सोमवारी (दि.28) ही सांगवी पोलिसांनी ही कारवाई केली.

सुग्रीव रोहीदास शिंदे (वय 45, रा. संकेत विहार, फुरसुंगी) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5 व 9 सहकलम प्राण्यांना क्रूरतेने वागवण्याचे अधिनियम 1960 कलम 11 अंतर्गत सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगेश मच्छिंद्र नढे (वय 28, रा. काळेवाडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कत्तलीसाठी पाच जनावरांची वाहतूक करताना आढळून आला. वाहनात जनावरांना दाटीवाटीने कोंबून त्यांना चारा पाण्याची कोणतीही सोय केली नाही. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन 1 लाख 80 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.