Pimpri news: झोपडपट्टी भागात बालकांच्या उज्वल भविष्यासाठी जनजागृती रॅली व पथनाट्याच्या आयोजन

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या दिशा या उपक्रमांतर्गत विशेष बाल पोलीस पथक, गुन्हे शाखा व पिंपरी पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने मुस्कान या सामाजीक संस्थेच्या वतीने वस्ती झोपडपट्टी भागात बालकांच्या उज्वल भविष्यासाठी जनजागृती रॅली व पथनाट्याच्या आयोजन करण्यात आले होते.

18 नोव्हेंबर 2022 रोजी अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांच्या संकल्पनेतून दिशा योग्य प्रमाण अंतर्गत विशेष बाल पोलीस पथक गुन्हे शाखा व पिंपरी पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने, फाउंडेशन फॉर चाइल्ड प्रोटेक्शन – मुस्कान या सामाजिक संस्थेच्या वतीने पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील वस्ती झोपडपट्टी भागात शाळाबाह्य बालके व व्यसनाच्या आहारी गेलेल्या बालकांच्या उज्वल भविष्यासाठी रॅली व पथनाट्य सादर करून जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Uddhav Thackeray Shivsena: पुण्यात युवती सेनेच्या सहसचिव शर्मिला येवले यांच्यासह ३६ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

संपूर्ण देशामध्ये 14 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर 2022 रोजी पर्यंत ” बालहक्क सप्ताह” साजरा होत आहे या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या दिशा या उपक्रमांतर्गत पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहननगर, विद्यानगर शंकरनगर, रामनगर या वस्ती/ झोपडपट्टी भागांमधील अज्ञानपणामुळे व व्यसनाच्या आहारी जाऊन नकळत गुन्हेगारी क्षेत्राकडे झुकलेल्या बालकांच्या उज्वल भविष्यासाठी फाउंडेशन फॉर चाइल्ड प्रोटेक्शन – मुस्कान या संस्थेचे स्वयंसेवक/ प्रतिनिधी तसेच त्या भागातील महिला/ गृहिणी समितीचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते यांच्या मार्फतीने रॅली आयोजित करून सदरचा रॅलीमध्ये बाल लैंगिक अत्याचार विरोधी पथनाट्य, तसेच व्यसनाच्या आहारी गेलेल्या बालकांना व त्यांच्या कुटुंबियांना व्यसनाधीनतेमुळे होणारे वाईट परिणाम त्याचबरोबर अर्धवट शाळा सोडलेल्या शाळाबाह्य बालकांना शिक्षणाचे महत्त्व सांगून अशा बालकांना पुनः श्च शाळेत दाखल करण्याबाबत जनजागृती करण्यात आली.

या जनजागृती कार्यक्रमात अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, स्वप्ना गोरे, पोलीस उपायुक्त (गुन्हे), प्रेरणा कट्टे, सहाय्यक पोलीस आयुक्त (चाकण विभाग), शंकर अवताडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पिंपरी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय गुलिंग, सहाय्यक पोलीस निरीक्षक, संपत निकम, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार शांताराम हांडे, महिला पोलीस नाईक दिपाली शिर्के, पोलीस शिपाई अमोल मुठे, पोलीस शिपाई कपिलेश इगवे, पोलीस शिपाई भूषण लोहारे यांनी या जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते. तसेच फाउंडेशन फॉर जाहीर प्रोटेक्शन- मुस्कान या सामाजिक संस्थेच्या व्यवस्थापक संचालिका शुभदा रणदिवे व संपूर्ण टीम तसेच रामनगर, शंकरनगर, विद्यानगर भागातील महिला/ गृहिणी समिती सदस्या सामाजिक कार्यकर्ते प्रतिनिधी यांनी शाळाबाह्य बालके व व्यसनाच्या आहारी गेलेल्या बालकांच्या उज्वल भविष्यासाठी रॅली व पथनाट्य सादर करून घोषणा देऊन जनजागृती केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.