Chinchwad News : 2020-21 च्या शिष्यवृत्ती परीक्षेत श्री फत्तेचंद जैन विद्यालयातील विद्यार्थांची चमकदार कामगिरी

एमपीसी न्यूज – 2020-2021 च्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत श्री फत्तेचंद जैन विद्यालयाचे तीन विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. Covid-19 च्या साथीमुळे सदर विद्यार्थ्यांना जादा तास घेऊन ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात आले होते.

संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी श्रीमान अॅड राजेंद्रकुमारजी शंकरलालजी मुथा व सहाय्यक सेक्रेटरी श्रीमान अनिलकुमारजी मोतीलालजी कांकरिया यांनी विद्यार्थ्यांचे यानिमित्त अभिनंदन केले आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणार्‍या शिक्षक व पालकांचे विद्यालयाच्या प्राचार्या नवले सुनिता, उपमुख्याध्यापिका जैन मनीषा, पर्यवेक्षक देवकाते सुभाष, विभाग प्रमुख शिरसाट संतोष यांनी सुद्धा गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

गुणवत्ता यादीत चमकदार कामगिरी करणारी तीन मुले – 

  • इयत्ता पाचवी – प्रणव लोटन शिंदे 82%, आयुष संतोष महाडिक 74%
  • इयत्ता आठवी – प्रणव कैलास पाटील 65%

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.