Chinchwad Crime News : चिंचवड, निगडी, सांगवीतून तीन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – चिंचवड, निगडी आणि सांगवी मधून तीन दुचाकी वाहने चोरीला गेली आहेत. याप्रकरणी गुरुवारी (दि. 27) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महेश राम माने (वय 26, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माने यांनी त्यांची 35 हजार रुपये किमतीची दुचाकी त्यांच्या ऑफिसच्या पार्किंग मध्ये लॉक करून पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी पार्किंग मधून दुचाकी चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 24) रात्री सव्वा अकरा वाजता घडली.

अविनाश आनंद मोरे (वय 25, रा. देहूरोड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोरे यांनी त्यांची 40 हजार रुएए किमतीची दुचाकी निगडी मधील पवळे ब्रिज येथील पार्किंग मध्ये पार्क केली होती. पार्किंग मधून अज्ञात चोरट्यांनी मोरे यांची दुचाकी चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 26) सकाळी साडेदहा ते रात्री साडेदहा वाजताच्या कालावधीत घडली.

आनंद रोहिदास लोंढे (वय 55, रा. औंध रोड, पुणे) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोंढे यांनी त्यांची 10 हजार रुपये किमतीची दुचाकी औंध जिल्हा रुग्णालय येथील पार्किंग मध्ये पार्क केली होती. तिथून अज्ञात चोरट्यांनी लोंढे यांची दुचाकी चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 25) सकाळी दहा ते गुरुवारी (दि. 27) दुपारी तीन वाजताच्या कालावधीत घडली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.