Dehuroad Crime News : फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – थकीत कर्जाची रक्कम, बँकेच्या दंडाची रक्कम, इतर खर्च आणि कार मधील म्युझिक सिस्टीम न देता दोघांनी एका व्यक्तीची तीन लाखांची फसवणूक केली. हा प्रकार फेब्रुवारी 2020 ते 27 जानेवारी 2022 या कालावधीत घडला.

बालाजी मधुकर खंकाळ (वय 32, रा. थेरगाव), शिवाजी मधुकर खंकाळ (वय 30, रा. उंचेठाण, ब्रह्मपुरी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी दादासाहेब धनाजी साबळे (वय 37, रा. मामुर्डी, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांची कार परत केल्यानंतर त्यांना द्यावयाची थकीत कर्जाची रक्कम, आयडीबीआय बँकेकडून झालेला दंड, इतर खर्च, सोनी कंपनीची ओरिजिनल डीव्हीडी म्युझिक सिस्टीम न देता एकूण दोन लाख 98 हजार 613 रुपयांची फसवणूक केली. फिर्यादी यांनी वारंवार फोन केले असता आरोपींनी त्यास प्रतिसाद दिलेला नाही. पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.