Pimpri News : पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांसाठी पणजी बस सेवा सुरु

एमपीसी न्यूज : नाताळ व नव वर्षाच्या सुट्ट्यासाठी जर तुम्हाला समुद्र किनारी आणि गोव्याला फिरायला जायचे असेल तर आता पिंपरी-चिंचवडकरांना (Pimpri News) पिंपरी बस आगारातूनच थेट पणजी साठी बस सेवा सुरु करण्यात आली आहे.

या साठी शिवशाही बस दररोज सकाळी 9 वा पिंपरी येथून सुटेल व पणजीला रात्री 7 – 8 दरम्यान पोहचेल. ती पणजीहून परत यायला सकाळी 6.30 वा सुटेल. यासाठी एका व्यक्तीचे प्रवास भाडे 1,055 रूपये तर लहान मुलाचे प्रवास भाडे 530 रुपये आहे. ही 42 सीटर बस आहे.

Pune News : पुणे महापालिकेच्या वतीने औंध व घोरपडी येथील अनधिकृत बांधकामावर हातोडा

प्रवाशांच्या सोयीसाठी आगाऊ आरक्षण पिंपरी-चिंचवड, शिवाजीनगर, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज या ठिकाणाहून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. Pimpri News) तरी या सुरक्षित प्रवासाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन रमाकांत गायकवाड विभाग नियंत्रक, पुणे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.