Pune News : पुणे महापालिकेच्या वतीने औंध व घोरपडी येथील अनधिकृत बांधकामावर हातोडा

एमपीसी न्यूज –  पुणे महापालिका बांधकाम व अतिक्रमण विभागाच्या (Pune News) वतीने शुक्रवारी (दि.23) धोरपडी व औंध भागातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करत बांधकामे पाडण्यात आली.

यामध्ये औंध परिसरात मुख्य रस्त्यावरील 12 हजार चौरस फुट क्षेत्रावरील बांधकामे व पत्राशेड काढण्यात आले. यामध्ये हॉटेलच्या फ्रंट मार्जिन मधील बांधकामाचा समावेश होता. तर घोरपडी येथील  झोन क्रमांक चार मधील सर्व्हे रोड 50 शिर्के रोडवरील 5 हजार 121 चौरस फुट क्षेत्रावरील बांधकाम व शेड हटवण्यात आले आहे.

Pune News : विमाननगर येथून 15 लाखांचे 52 ग्रॅम वजनाचे कोकेन जप्त

ही कारवाई बांधकाम व अतिक्रमण विभागाकडील (Pune News) अधिक्षक अभियंता सुधीर कदम,  कार्यकारी अभियंता विपीन शिंदे, उप अभियंता समीर गडई, कनिष्ठ अभियंता गजानन सरणे, विठ्ठल मुळे यांनी केली. जेसीबीच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.