Pune News : विमाननगर येथून 15 लाखांचे 52 ग्रॅम वजनाचे कोकेन जप्त

एमपीसी न्यूज विमाननगर येथून पोलिसांनी एकाकडून (Pune News) 15 लाखांचे 52 ग्रॅम वजनाचे कोकेन जप्त केले आहे. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथक 1 यांनी गुरुवारी (दि.22) केली.

अख्तर नुरलहोदा शेख (वय 34 धानोरी, मुळ-बिहार) असे अटक आरोपीचे नाव असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक 1 हे विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना खबर मिळाली की, एक इसम विमाननगर परिसरात स्वीफ्ट कार (एमएच 12 केजे 2934) मध्ये एकजण अंमली पदार्थ विक्री करत असल्याची खबर मिळाली.

Pune News : लष्कराच्या वतीने तेहतीस शहरांमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सार्वजनिक रोडवरून आरोपीला कार सह ताब्यात घेतले. यावेळी कारची झडती घेतली असता त्याच्याकडून 10 लाख 42 हजार 400 रुपयांचे (Pune News) 52 ग्रॅम 120 मिलीग्रॅम कोकेन हा अंमली पदार्थ तसेच 5 हजार रुपये रोख रक्कम, 10 हजार 500 रुपयांचे दोन मोबाईल फोन, स्विफ्ट कार असा एकूण 15 लाख 57 हजार 900 रुपयांचा एवज जप्त केला आहे. आरोपी विरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात एन डी पी एस अक्ट गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

2022 साली सव्वा पाच कोटीचे अंमली पदार्थ जप्त तर 92 आरोपी अटकेत

जानेवारी 2022 पासून ते डिसेंबर 2022 पर्यंत अंमली पदार्थ विरोधी पथक एक यांनी 5 कोटी 36 लाख 13 हजार 250 रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले असून त्यामध्ये 70 लाख1 हजार 20 रुपयांचा गांजा,9 लाख 91 हजार 290 रुपयांचे अफिम, 1 कोटी 84 लाख 54 हजार 600 रुपयांचे एम डी (मेफेड्रोन) 2 कोटी 64 लाख 96 हजार 650 रुपयांचे कोकेन, 58 हजार 350 रुपयांचे ब्रोऊन शुगर, 1 लाख 10 हजार रुपयांचे एम डी एम ए, 1 लाख 87 हजार 720 रुपयांचे चरस जप्त केले आहे. तर या प्रकरणात 92 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.