Ganeshotsav : पुण्यात गणेशभक्तांसाठी पार्किंग व्यवस्था जाहीर

एमपीसी न्यूज – सध्या सुरु असलेल्या सणासुदीच्या काळात वाहतूक कोंडी आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे वाहतूक विभागाने रस्त्यांवर वाहने पार्क करण्यास मनाई केली आहे. पाच सप्टेंबर ते आठ सप्टेंबर दरम्यान वापरता येणारी 19 पार्कींग क्षेत्रे निश्चित केली आहेत. त्याशिवाय पुणे शहर वाहतूक विभागाने 18 पार्कींगची ठिकाणे ओळखली आहेत जी विसर्जनाच्या दिवशी 9 सप्टेंबर आणि 10 सप्टेंबर रोजी वापरता येणार आहेत. पाच सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन झाल्यानंतर लोक सहकुटुंब गणपती दर्शनासाठी बाहेर पडतील आणि त्यामुऴे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि वाहतूक पोलिसांनी पार्कींगची  व्यवस्था केली आहे.

रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी लक्षात घेऊन आम्ही एक वाहतूक आराखडा तयार केला आहे आणि शहरातील 19 पार्कींग क्षेत्रे ओळखली आहेत. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी आम्ही 18 पार्किंग ठिकाणे निश्चित केली आहेत. त्यामुळे लोकांना त्यांची वाहने संबंधित ठिकाणी पार्क करता येतील व कोणत्याही अडथळ्याविना उत्सवाचा आनंद घेता येईल, असे वाहतूक पोलीस उपायुक्त श्रीरामे म्हणाले. भक्तांनी त्यांची वाहने नेमून दिलेल्या पार्किंगच्या ठिकाणी पार्क करुन आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

पार्किंगची ठिकाणे पुढीलप्रमाणे – गरवारे महाविद्यालय, डेक्कन एज्युकेशन सोसायटी,काँग्रेस भवन, मनपा भवन, सीओईपी मैदान, मंगला टॅकिज,हमालवाडा पार्किंग, जयंतराव टिळक पूल ते भिडे पूल, नदीपात्राचा रस्ता, संजीवनी रुग्णालय,गाडगीळ पुतळा ते कुंभारवेस, फर्ग्युसन महाविद्यालय, आपटे प्रशाला,पुरम चौक ते हॅटेल विश्व रस्त्याच्या डाव्या बाजूस, न्यू इंग्लिश स्कूल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.