_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Patanjali Coronil Medicine: पतंजलीच्या ‘कोरोनिल’ला मोदी सरकारची मंजुरी, पण ‘या’ अटींवर

Patanjali Coronil Medicine: Modi Government approves Patanjali's medicine, but on 'these' terms या औषधामुळे कोरोनाचे 67 टक्के रुग्ण तीन दिवसात आणि सात दिवसात 100 टक्के रुग्ण बरे झाल्याचा दावा करण्यात आला होता.

एमपीसी न्यूज- योगगुरु रामदेव बाबा यांच्या दिव्य योग फार्मसीचे औषध ‘कोरोनिल’ला केंद्रीय आयुष मंत्रालयाने हिरवा झेंडा दाखवला आहे. दिव्य योग फार्मसीला आता या औषधांची विक्री करता येईल. परंतु, ही परवानगी देताना केंद्रीय आयुष मंत्रालयाने त्यांच्यासमोर काही अटी ठेवल्या आहेत. या औषधाची विक्री आणि प्रचार-प्रसार कोरोनाचे औषध म्हणून करता येणार नाही. त्याचबरोबर औषधांच्या पॅकिंगवर कोरोनाचा कुठेच उल्लेख किंवा चित्र छापले जाऊ नये. राज्य औषध नियंत्रक द्वारा जारी करण्यात आलेल्या परवान्याच्या आधारे पतंजली या औषधांची विक्री करु शकेल. हे औषध ते इम्युनिटी बुस्टर (रोग प्रतिकारशक्ती बूस्टर) म्हणून विकू शकतील.

पतंजलीच्या दिव्य फार्मसीने कोरोनिल नावाचे औषध तयार केले आहे. रामदेव बाबा, आचार्य बालकृष्ण, निम्स जयपूरच्या संचालकांनी गत महिन्यात 23 जून रोजी एक पत्रकार परिषद घेऊन कोरोना किटी नावाने हे औषध लाँच केले होते.

_MPC_DIR_MPU_II

कोरोनावरील उपचारावर गुणकारक औषध असल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता. कोरोनाच्या रुग्णांवर याचे क्लिनिकल ट्रायल केल्याचेही सांगण्यात आले होते. या औषधामुळे कोरोनाचे 67 टक्के रुग्ण तीन दिवसात आणि सात दिवसात 100 टक्के रुग्ण बरे झाल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु, काही तासातच केंद्रीय आयुष मंत्रालयाने याच्या विक्री आणि प्रचार-प्रसारावर बंदी घातली होती.

पतंजलीच्या दाव्यानंतर आयुष मंत्रालयाने त्यांना खुलासा करण्यासाठी नोटीस धाडली होती. या नोटिसीला उत्तर देताना त्यांनी आपला दावा मागे घेतला. आपण असा दावाच केला नव्हता असा यू-टर्न पतंजलीने केला होता. त्यानंतर इम्युनिटी बुस्टर म्हणून कोरोनिलला परवानगी देण्यात आले असल्याचे वृत्त न्यूज 18 ने दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.