Pune: कोरेगाव पार्क परिसरात रिक्षा चालकाचा दगडाने ठेचून खून

Pune: A rickshaw driver was stoned to death in Koregaon Park area विनायक जगताप हा रिक्षा चालक होता. त्याला दारुचे व्यसन होते, असे सांगण्यात येते.

0

एमपीसी न्यूज- पुणे शहरातील कोरेगाव पार्क या उच्चभ्रू परिसरात एका रिक्षा चालकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी मध्यरात्री हा खून झाल्याचे सांगण्यात येते. विनायक जगताप असे मृत रिक्षा चालकाचे नाव आहे. कोरेगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

विनायक जगताप हा रिक्षा चालक होता. त्याला दारुचे व्यसन होते, असे सांगण्यात येते. ही घटना कोरेगाव पार्कमधील लेन नंबर पाचजवळ घडली. कोरेगाव पोलीस तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like