Pune: कोरोनाच्या संकट काळात डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांकडून 24 तास सेवा- विश्वजित कदम

Pune: 24-hour service from doctors and other staff during Corona crisis - Vishwajit Kadam डॉक्टरांना धन्वंतरी मूर्ती, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

0

एमपीसी न्यूज- सध्या कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. या काळात डॉक्टर आणि इतर कर्मचारी 24 तास काम करीत असल्याचे कृषी सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम म्हणाले.

दि. 1 जुलै रोजी ‘डॉक्टर डे’ संपूर्ण देशभर साजरा केला जातो. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि पुणे काँग्रेस कमिटी डॉक्टर सेलतर्फे मागील 14 वर्षे रुग्णसेवेत सतत कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान सोहळा आयोजित केला जातो.

यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्ण डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येतात. या डॉक्टरांना धन्वंतरी मूर्ती, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले असताना डॉक्टरांचे कार्य अतिशय महत्वपूर्ण असल्याचे रमेश बागवे यांनी सांगितले.

यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष रमेश बागवे, सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड, डॉ. रवींद्रकुमार काटकर, पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, डॉ. पाटसुते यावेळी उपस्थित होते.

11 डॉक्टरांना प्रातिनिधिक स्वरूपात सन्मानित करण्यात आले. डॉक्टर सेलचे डॉ. संभाजी करांडे, डॉ. मंगेश वाघ, डॉ. फुरकान काझी यावेळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like