Pavana Dam update :  पवना धरण 61 टक्के भरले ; चोवीस तासात 105 मिली मीटर पाऊस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकर आणि मावळवासीयांची तहान भागविणाऱ्या पवना धरण परिसरात पावसाची संततधार (Pavana Dam update ) सुरूच आहे.  गेल्या 24 तासात 105 मिली मीटर पावसाची नोंद झाली असून  धरणातील पाणीसाठा 61.12 टक्यांवर गेला आहे.

Pune : उद्याच्या सक्षम नेतृत्वासाठी संस्कारांची गरज – भूषण गोखले

पवना धरणातून पिंपरी-चिंचवड, मावळातील गावांना, शेतीला पाणीपुरवठा केला जातो. या भागासाठी पाणी पुरवठ्याचा पवना धरण मुख्य स्त्रोत आहे. पवना धरणाचे काम सन 1972 साली पूर्ण झाले आहे. महापालिका पवना नदीतून रावेत येथील  बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो.  सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो.

धरणातील पाण्याची परिस्थिती!

# गेल्या 24 तासात झालेला पाऊस – 105 मिली मीटर

# 1 जूनपासून झालेला एकूण पाऊस –  1342मिली मीटर

# गेल्यावर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस –  1545 मिली मीटर

#  धरणातील सध्याचा पाणी साठा – 61.12 टक्के

# गेल्यावर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा – 76.22 टक्के

# गेल्या 24 तासात पाणी साठ्यात झालेली वाढ – 5 टक्के

# 1 जूनपासून पाणी साठ्यात झालेली वाढ – 43.22  टक्के

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.