Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये रोटरी तर्फे विविध उपक्रम

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब पुणे (कात्रज) यांच्या वतीने तळेगाव दाभाडे येथील कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविले. विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

 

यावेळी आरवायएलएचे अध्यक्ष मिलिंद आणि मुग्धा कुलकर्णी,सचिव अस्मिता पाटील, आरटीएन उदय थत्ते, प्रसाद गडकरी, उदय थत्ते,युवा संचालक कलेश नेरुरकर,आरटीआर अन्विता नेरुरकर, आरटीआर अक्षय कुलकर्णी आणि  अश्वथ नेरुरकर उपस्थित होते.

 

रोटरी क्लब पुणे (कात्रज) यांनी कृष्णराव भेगडे स्कूलमध्ये मध्ये 15 व  16 जुलै 2023 रोजी विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाची सुरुवात 15 जुलै रोजी उद्घाटन समारंभाने झाली. प्रमुख पाहुणे जिल्हा युवा संचालक श्री.विष्णू सर यांनी सत्राचे उद्घाटन केले. श्री.सारंग मातडे यांनी ‘प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स’ यावर मार्गदर्शन केले. जिल्हा युवा समुपदेशक दिवाकरन पिल्लई यांनी ‘ नेतृत्व वाढ’ आणि ‘संघ बांधणी’ या विषयावर उपक्रम राबविला.

 

Pavana Dam update :  पवना धरण 61 टक्के भरले ; चोवीस तासात 105 मिली मीटर पाऊस

 

शेवटचे सत्र भावनिक बुद्धिमत्तेवर होते.त्यावर मार्गदर्शन स्मिता विखणकर यांनी केले. दुसऱ्या दिवसाची सुरुवात योग आणि ध्यानाने झाली.  हे सत्र कल्याणी मुंगी यांनी घेतले. त्यानंतर श्री. सारंग माताडे द्वारे  ‘भाषण सत्र’  आयोजित केले गेले. अनिश होले द्वारे ‘रिलेशनशिप बिल्डिंगवर’ ग्रुप अ‍ॅक्टिव्हिटी आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या शेवटी, प्रमुख पाहुणे जिल्हा युवा (RYLA) सह अध्यक्ष भालचंद्र लेले यांच्या हस्ते सर्व 250 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

 

इयत्ता 8 वी ते 10 वीचे सर्व विध्यार्थी व शिक्षक या उपक्रमात सहभागी झाले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संदीप काकडे,खजिनदार अनिल ताणकर, शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर (Talegaon Dabhade) उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.