PMPML : कामात हलगर्जीपणा दाखवल्या प्रकरणी पीएमपीएमएलचे 36 कर्मचारी निलंबित ; तिघांना केले बडतर्फ

एमपीसी न्यूज – वारंवार नोटीस देऊन ही कामात सुधारणा न झालेल्या कर्मचाऱ्यांना ( PMPML ) अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी बडगा उगारला आहे. त्यांनी कारवाई करत कर्मचाऱ्यांवर थेट बडतर्फी व निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे अनेक कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

कामावर सतत गैरहजर राहणारे 36 कर्मचारी निलंबित करण्यात आले, तर आणखी बेशिस्त अशा तिघांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. याशिवाय 15 आगारांतील 142 कर्मचाऱ्यांवर आरोपपत्र ठेवण्यात आले. या कर्मचाऱ्यांना म्हणणे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये रोटरी तर्फे विविध उपक्रम

कर्मचाऱ्यांच्या कार्यशैलीत सुधारणा व्हावी, त्यांना शिस्त लागावी म्हणून सिंह यांनी विभागप्रमुख व सुपरवायजर दर्जाच्या अधिकाऱ्यांना आगारे दत्तक दिली. अधिकाऱ्यांनी आगारांची पाहणी केली तेव्हा अनेक कर्मचारी सतत गैरहजर असल्याचे, तसेच इतर अनेक कामात कसूर करताना आढळले. ही बाब गंभीर असल्याने त्यांना कारवाई करणे भाग पडले. सिंह यांनी विविध स्तरावर प्रयत्न सुरु केले आहेत.

प्रवाशांना चांगली सेवा मिळावी, बस रद्द होण्याचे प्रमाण कमी व्हावे या हेतूने त्यांनी उपाययोजना करण्यास सुरवात केली. दर शनिवारी पहाटे पाच वाजता नेमून दिलेल्या आगारात जाऊन कामाची पाहणी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले. मागील दोन्ही शनिवारी अशी पाहणी केली. त्यानंतर प्रत्यक्षात काम सुरु आहे याची माहिती मिळाल्यानंतर सिंह यांनी कडक कारवाईस सुरुवात केली.

पीएमपीएमएल अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून सचिंद्र प्रताप सिंह हे अनेक वेळा स्वतः बसमधून प्रवास करतात. अपेक्षित बदलांबाबत ते प्रवाश्यांशी चर्चा करतात. त्यामुळे गेल्या काही दिवसांत पीएमपीएमएलच्या उत्पन्नात काही प्रमाणात वाढही झाली. मात्र कर्मचाऱ्यांअभावी बसच्या फेऱ्या रद्द करणे भाग पडत असल्यामुळे अध्यक्षांनी थेट कारवाई ( PMPML ) केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.