Pavananagar News : बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने आर्थिक साक्षरता मेळावा

एमपीसी न्यूज – बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने बँक राष्ट्रीयीकरण दिवस, आर्थिक साक्षरता मेळावा घेऊन साजरा करण्यात आला. पवनानगर, काळे कॉलनी येथील शाखेत सोमवारी (दि.19) हा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमासाठी राज्य स्तरीय बँकर्स समिती उप महाव्यवस्थापक राजेश देशमुख, जिल्हा अग्रणी बँक मुख्य व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर, जिल्हा परिषद सदस्य गणेश धनिवडे, वित्तीय साक्षरता अधिकारी पी. एस. सरडे, बँक ऑफ महाराष्ट्र काळे कॉलोनी स्टाफ, पवनानगर परिसरातील संलग्न दहा गावांतील विद्यमान सरपंच, तसेच किरण राक्षे, गणेश धानिवले, गणेश ठाकर, नारायण बोडके, वसंत म्हस्कर मारुती मोहळ, सुरेश आडकर, स्वप्नील तुपे, किरण बोडके, सोपान सावंत, सुजाता पडवळ, सिमा ठाकर, माऊली ठाकर, प्रतिभा डहाळे व असंख्य संख्येने लाभार्थी उपस्थित होते.

बँक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले व सामाजिक सुरक्षा योजनांचे महत्व पटवून देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.