Chikhali News : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने राज्यस्तरीय खुल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

एमपीसीन्यूज : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर आणि दत्ताकाका साने प्रतिष्ठान, चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय खुल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेचे संयोजक व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष यश साने यांनी ही माहिती दिली. कोरोना महामारीचे संकट कायम असल्याने ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बुधवारी दि. 21 जुलैपर्यंत नावनोंदणी करून व्हिडिओ पाठवावेत. त्यासाठी 9970023174 या क्रमांकावर संपर्क साधावा. प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विजेत्यास 21 हजार रुपये, तर द्वितीय आणि तृतीय क्रमांकास अनुक्रमे 15 हजार आणि 10 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

तसेच सर्वाधिक लोकप्रिय वक्ता पारितोषिकासाठी 5 हजार रुपये आणि विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या 10 स्पर्धकांना प्रत्येकी 1  हजार रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. शिवाय स्पर्धेतील सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रही देण्यात येणार असल्याचे यश साने यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.