PCMC: गॅलरीला कर आकारला जातो का? मालमत्ता धारकांचा करसंवादमध्ये प्रश्न

एमपीसी न्यूज – म्हाडातर्फे बांधलेल्या घराची (PCMC) खरेदी गेल्या महिन्यात केली, मात्र 2017 पासून थकलेला कर आम्ही कसा भरणार, एकच इमारतीमधील दोन सदनिकांना वेगवेगळ्या कर कसा काय? शास्तीकर न भरता मुळ कर भरता येतो का? गॅलरीला कर आकारला जातो का? यासह मालमत्ता धारकांच्या विविध प्रश्‍नांच्या शंकाचे निरंसन करसंवादमध्ये कर आकारणी व कर संकलन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले.

पिंपरी-चिंचवड शहरात 5 लाख 82 हजार मिळकतींची नोंदणी आहे. या सर्व मिळकतींना महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत कर गोळा केला जातो. करदात्यांचे विविध प्रश्‍न, त्यांना करासंदर्भात येणाऱ्या अडचणी, मनातील शंकांची सोडवणूक करण्यासाठी जनसंवाद सभेच्या धर्तीवर ऑनलाइन पद्धतीने करसंवादचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार आज शनिवार (दि.26) सकाळी 11.30 वाजता फेसबुक, ट्विटर, युट्यूबच्या माध्यमातून करसंवाद पार पडला.

या करसंवादमध्ये सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांच्यासह (PCMC) प्रशासन अधिकारी नाना मोरे, महेंद्र चौधरी, कार्यालयीन अधिक्षक चंद्रकांत विरणक, सर्व मंडलाधिकारी उपस्थित होते. या करसंवादमध्ये 50 पेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग घेतला. 40 नागरिकांनी ऑनलाइन प्रश्‍न विचारले. तर 12 मालमत्ताधारक प्रत्यक्षात महापालिकेत येऊन ऑफलाइन सहभागी झाले होते. यावेळी अनेकांचे प्रश्‍न तत्काळ मार्गी लावण्यात आले.

Pimpri News : संविधान सर्वांच्या रोजच्या जगण्याचा भाग झाले तर…

याबाबत सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख म्हणाले, म्हाडातर्फे बांधलेल्या घराची खरेदी गेल्या महिन्यात केली. मात्र, 2017 पासून थकलेला कर आम्ही कसा भरणार, एकच इमारतीमधील दोन सदनिकांना वेगवेगळ्या कर कसा काय? शास्तीकर न भरता मुळ कर भरता येतो का? गॅलरीला कर आकारला जातो का? मालमत्तेवरील नाव बदलण्याची प्रक्रिया किती दिवसात होते? बक्षीस पत्र करण्यास किती खर्च येतो? मिळकतीच्या नोंदणीवेळी गॅलरी, जिन्याचा सरसकट परिसर देखील पकडला जातो का? शास्तीकर सोडून मूळ कर भरण्याला संमती आहे का? आदी प्रश्‍न मालमत्ता धारकांनी विचारले. यासह मालमत्ता धारकांनी व्यक्तीगत मिळकतीसंदर्भात आणि कायदेशीर प्रश्‍नही विचारले. या सर्व प्रश्‍नांची समर्पक उत्तरे देऊन मालमत्ता धारकांच्या शंकाचे निरंसन करण्यात आले. मालमत्ता धारकांना उच्च दर्जाच्या सेवा देण्यासाठी करसंकलन विभाग सातत्याने नवनवीन प्रयोग राबवत आहे. शहरातील मालमत्ता धारकांचा याला प्रतिसाद मिळत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.