Pune Sports : सेंट व्हिन्सेंट, जे एन पेटिटचे चमकदार विजय

एमपीसी न्यूज : सेंट व्हिन्सेंट आणि जेएन पेटिट टेक्निकल प्रशाला (Pune Sports) संघांनी शनिवारी येथील लॉयला फुटबॉल चषक स्पर्धेत चमकदार विजयाची नोंद केली. स्पर्धेतील 12 वर्षांखालील गटात सेंट व्हिन्सेंट एचएस संघाने कल्याणी शाळेचा 1-0 असा पराभव केला. सम्यक भंडारीने सामन्यातील एकमात्र विजयी गोल 19व्या मिनिटाला केला. 14 वर्षांखालील गटात मात्र, कल्याणी शाळेने सेंट व्हिन्सेंट संघाला गोलशून्य बरोबरीत रोखले.

जे.एन. पेटिट प्रशाला संघाने दोन विजय मिळविले. मुलांच्या 14 वर्षांखालील गटात जे.एन. पेटिटने पाच मिनिटांच्या कालावधीत दोन गोल करत विद्या भवनला 2-0 असे पराभूत केले. सिद्धांत साळुंकेने 43, तर सादिक सय्यदने 48व्या मिनिटाला गोल केला.

त्यानंतर निधिश भोसलेने (5वा, 49वे मिनिट) केलेल्या दोन गोलच्या जोरावर जे.एन. पेटिट प्रशाला संघाने 16 वर्षांखालील गटातही विद्या भवन प्रशाला संघावर 2-0 असाच विजय मिळविला.

PCMC: गॅलरीला कर आकारला जातो का? मालमत्ता धारकांचा करसंवादमध्ये प्रश्न

निकाल –

12 वर्षांखालील: सेंट व्हिन्सेंट प्रशाला : 1 (सम्यक भंडारी 19वे मिनिट) वि.वि. कल्याणी स्कूल: 0

14 वर्षांखालील : सेंट व्हिन्सेंट प्रशाला 0 अनिर्णित वि. कल्याणी स्कूल 0

जे एन पेटिट : 2 (सिद्धांत साळुंके 43वे; सादिक सय्यद 48वे मिनिट) वि.वि. विद्या भवन प्रशाला 0

16 वर्षांखालील : जे एन पेटिट : 2 (निधीश भोसले 5वे, 49वे मिनिट) वि.वि. विद्या भवन प्रशाला 0

निकाल (गुरुवार): Pune Sports

12 वर्षाखालील: एसएसपीएमएस (बोर्डिंग): 4 (रक्षीद पाटील 2रे, 18वे; स्वराज माने 11वे; भद्रा निकुभ 25५वे) वि.वि. डॉ. शामराव कलमाडी प्रशाला : 0

14 वर्षांखालील: डॉ. शामराव कलमाडी प्रशाला : 1 (रुद्र नलावडे 25वे मिनिट) वि.वि. एसएसपीएमएस (बोर्डिंग) : 0

डॉ. शामराव कलमाडी प्रशाला : 5 (तनिश अयचिते 6, 20, 30वे मिनिट; दर्श सोळंकी 44, 61वे मिनिट) वि.वि. एसएसपीएमएस (बोर्डिंग) : 2 (श्रीनिवास महाले 8, 63वे मिनिट)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.