PCMC : दिव्यांग सर्वेक्षणाला 26 मार्चपर्यंत मुदतवाढ

एमपीसी न्यूज  – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागांतर्गत ( PCMC ) करण्यात येत असलेल्या दिव्यांग सर्वेक्षणाला  26 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागांतर्गत येणाऱ्या दिव्यांग कक्षातर्फे विविध दिव्यांग कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्याअंतर्गत 26 डिसेंबर 2023 पासून 60 दिवसांपर्यंत म्हणजे 26 फेब्रुवारी 2024 पर्यंत शहरातील विविध दिव्यांग योजनांचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग व्यक्तींच्या हयातीच्या दाखल्याबाबत घरोघरी जाऊन समक्ष सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाची मुदत 26 मार्च 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

Pimpri : आता महापालिकेच्या रुग्णालय परिसरात जेनेरिक औषधांची दुकाने

ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचा राहण्याचा पत्ता, मोबाईल क्रमांक बदलला असेल, त्यांनी तात्काळ योग्य पुराव्यांसह लेखी अर्ज मुख्य कार्यालयात सादर करावा. तसेच हयातीच्या दाखल्याबाबत होणाऱ्या सर्वेक्षणाला महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन समाज विकास विभागाचे सहायक आयुक्त श्रीनिवास दांगट यांनी केले ( PCMC ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.