Pimpri : आता महापालिकेच्या रुग्णालय परिसरात जेनेरिक औषधांची दुकाने

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या वायसीएम, नवीन थेरगाव, आकुर्डी, नवीन जिजामाता, नवीन भोसरी या पाच ( Pimpri ) रुग्णालयांच्या परिसरात जेनेरिक औषधांची दुकाने सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे  सर्वसामान्य जनतेला आता स्वस्त दरामध्ये रुग्णालय परिसरातच औषधे मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

Maharshtra : मराठी भाषा गौरवदिनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत 39 पुस्तकांचे प्रकाशन

पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेचे 32 दवाखाने आणि आठ मोठी रुग्णालये आहेत. संत तुकारामनगर येथे महापालिकेचे 750 खाटांचे यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय आहे. पुणे जिल्ह्यातील नागरिक उपचारासाठी महापालिकेच्या रुग्णालयात येतात. अनेकदा रुग्णांना आवश्यक असणारी औषधे महापालिका रुग्णालयात उपलब्ध नसतात. त्यामुळे नाइलाजाने खासगी दुकानामधून औषधे आणावी लागतात. औषधे महागडी असतात. त्यामुळे महापालिकेच्या पाच रुग्णालय परिसरात जेनेरिक औषधांची दुकाने सुरू केली जाणार आहेत.

नॅकोफ इंडिया लिमिटेड या कंपनीला महापालिका रुग्णालय परिसरात अमृत स्टोअर्सच्या धर्तीवर जेनेरिक औषधांचे दुकान सुरू करण्यासाठी  थेट पद्धतीने भाडे तत्त्वावर जागा उपलब्ध करून देणार आहे. कंपनीला 150 ते 186 चौरस फूट क्षेत्रफळाचे पाच गाळे दरमहा 32 हजार 242 रुपये भाडे दराने दहा वर्षांसाठी देण्यात आले ( Pimpri ) आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.