PCMC News:  शिष्यवृत्ती योजनेचा 1 हजार 193 दिव्यांग विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC News) समाज विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दिव्यांग कल्याणकारी योजनेअंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांकरीता पंडीत दिनदयाळ उपाध्याय ही शिष्यवृत्ती योजना लाभदायक ठरत आहे. या योजनेअंतर्गत गेल्या पाच वर्षांत 1 हजार 193 दिव्यांग विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे.

याबाबतची माहिती महापालिकेच्या दिव्यांग कक्षाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट यांनी दिली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिक, महिला, विद्यार्थ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. दिव्यांग कक्षामार्फत इयत्ता पहिली ते 18 वयोगटापर्यंत 40 टक्‍यांच्या पुढे दिव्यांग असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 2018 मध्ये शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे.

Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘इंडस्ट्री अकॅडेमिया फोरमची’ स्थापना

विद्यार्थ्यांना दरवर्षी शिक्षणासाठी 24 हजार रूपयांची शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. गेल्या पाच वर्षांत या योजनेअंतर्गत 1 हजार 193 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. आत्तापर्यंत 28 कोटी 6 लाख 32 हजार रूपयांचे वाटप झाले आहे. या योजनेतील अटी व शर्तीनुसार, संबंधित लाभार्थीने अथवा लाभार्थीच्या पालकांनी, दिव्यांग विद्यार्थ्यांचा फॉर्म दरवर्षी नव्याने भरणे आवश्‍यक होते. मात्र, आता लाभार्थ्यांकडून एकदाच अर्ज भरुन घेण्यात येणार आहे. मात्र, दरवर्षी हयातीचा दाखला व शाळेत शिक्षण घेत असल्याबाबतचे बोनाफाईड प्रमाणपत्र (PCMC News) जमा करणे आवश्‍यक आहे.

सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट म्हणाले, ”दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणातील गोडी निर्माण व्हावी, पैशांमुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी पंडीत दिनदयाळ उपाध्याय या योजनेअंतर्गत दरवर्षी 24 हजार रूपयांची शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. चालू आर्थिक वर्षांत आत्तापर्यंत 107 विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीसाठी अर्ज आले आहेत. यासाठी दिड कोटी रूपयांची तरतूद आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.