PCMC News: सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये या आठवड्यातील जनसंवाद सभा पुढच्या सोमवारी 22 ऑगस्टला होणार 

एमपीसी न्यूज: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये दर सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. मात्र सोमवार  दि. 15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्यदिन आणि दि. 16 ऑगस्ट रोजी पारशी नुतनवर्षानिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने या आठवड्यात जनसंवाद सभा होणार नाही. मात्र त्यानंतर या सभांचे कामकाज नियमितपणे सुरू राहणार आहे.(PCMC News) जनसंवाद सभा पुढील आठवड्यात म्हणजेच सोमवार 22 ऑगस्टला सकाळी 10 ते 12 यावेळेत होणार आहे, अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली. या आठवड्यात सलग सार्वजनिक सुट्ट्या आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून झालेल्या बदलाची नोंद नागरिकांनी घ्यावी असे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.

 

नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणा-या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय दर सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येत असते. तसा निर्णय प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी घेतला आहे. या सभेकरीता महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय मुख्य समन्वय अधिका-यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

Flag distribution: पिंपरीमध्ये नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने 3000 राष्ट्रध्वजाचे मोफत वाटप

यामध्ये, उप आयुक्त तथा प्र. कायदा सल्लागार चंद्रकांत इंदलकर, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, स्थापत्य उद्यान विभागाचे सहशहर अभियंता सतीश इंगळे, पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, शहर अभियंता मकरंद निकम,(PCMC News) भूमी आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी, आरोग्य विभागाचे उपआयुक्त अजय चारठाणकर यांची अनुक्रमे अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह या  क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे मुख्य समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान ते भुषवत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.