PCMC : कोजागरीच्या निमित्ताने आज मध्यरात्री 12 वाजेपर्यंत उद्याने सुरू

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड महानगपालिकेच्या हद्दीतील (PCMC ) सर्व उद्याने कोजागरीच्या निमित्ताने आज दिनांक 28 ऑक्टोबर 2023 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहतील अशी माहिती उद्यान विभागाने प्रसिद्धीस दिली आहे.

Pune : शिवप्रिया कथक नृत्य कार्यक्रमास रसिकांची दाद

महापालिकेच्या 8 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत (Pune) उद्यान विभागाकडून उद्याने, मत्स्यालय आणि प्राणिसंग्रहालय विकसित करण्यात आले आहे. उद्यानांचे विकसन, सुशोभीकरण, देखभाल-दुरुस्तीविषयक कामे उद्यान विभागाकडून केली जातात. (PCMC) यातील बहुतांश मोठ्या उद्यानांमध्ये नागरिकांची नियमित गर्दी असते. कोजागरी पौर्णिमेनिमित्त दर वर्षी नागरिक उद्यानांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.