PCMC : उद्योजकतेला पोषक वातावरण निर्मितीसाठी पिंपरी-चिंचवड एक ‘व्यासपीठ’ – शेखर सिंह

आकाशवाणी पुणे आणि ऑटो क्लस्टर यांच्यावतीने “उद्योजकता विकासासाठी G20 कॉन्क्लेव्ह” चे आयोजन

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड हे एक गतिमान शहर आहे. देशाच्या विकासात योगदान देण्याची शहराची अफाट क्षमता (PCMC) आहे. उद्योग आणि संधीचे केंद्र म्हणून शहराकडे पाहिले जाते. उद्योग – व्यवसाय उभारणीसाठी कुशल कर्मचारी वर्ग, गुंतवणूकदारांसाठी हे शहर अनुकूल आहे. शहराची निरंतर प्रगती, तरुणांना सक्षम बनविणे तसेच त्यांच्या रोजगारासाठी पायाभूत सुविधा, अचूक शहरी नियोजन आणि कौशल्य विकास उपक्रमांना प्रोत्साहन देण्याकरीता महानगरपालिका सक्षमपणे आपली भूमिका बजावत आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उद्योजकतेला पोषक वातावरण निर्मितीसाठी आणि तरूणांचे स्वप्न बहरण्यासाठी त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरीता महानगरपालिका नेहमीच पुढाकार घेत आहे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केले.


Pimpri : वेल्डिंगचे स्पार्क उडाल्याने चप्पलच्या दुकानात आग

आकाशवाणी पुणे आणि ऑटो क्लस्टर विकास आणि संशोधन संस्था यांच्यावतीने 7 रोजी ऑटो क्लस्टर, प्रेक्षागृह येथे “उद्योजकता (PCMC) विकासासाठी G20 कॉन्क्लेव्ह” चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन करताना आयुक्त सिंह बोलत होते.

यावेळी, डायनॅमिक इंजिनीअरिंग आणि सोल्युशन्सचे व्यवस्थापकीय भागीदार प्रदीप कुलकर्णी, व्यवस्थापन सल्लागार अनिरुद्ध मोडक, पुणे आकाशवाणीचे संचालक इंद्रजित बागल, ऑटो क्लस्टरचे व्यवस्थापकीय संचालक किरण वैद्य, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, उपायुक्त रविकिरण घोडके यांच्यासह मोठया संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. प्रसंगी, मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. तसेच, उपस्थितांचा सन्मान चिन्ह देवून सत्कार सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे आकाशवाणीचे संचालक इंद्रजित बागल यांनी केले.

डायनॅमिक इंजिनीअरिंग आणि सोल्युशन्सचे व्यवस्थापकीय भागीदार प्रदीप कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना यशाचा कानमंत्र दिला. ते म्हणाले की, तरुणांनी नवनवीन क्षेत्रात मजल मारली पाहिजे. छोटया स्वप्नांपासून करिअरची सुरुवात करून कामात एकलव्यासारखे झोकून द्यायला हवे. दुस-याचे प्रोडक्ट विकण्यापेक्षा स्वत:चे प्रोडक्ट तयार करा. संधी शोधतांना स्वयंपाक घर चालले पाहिजे, याची दक्षता घ्या. शांत बसू नका, उद्योगी व्यक्तीच यशस्वी होतो हे लक्षात ठेवा. आर्थिक नियोजनावर भर द्या. कोविड काळात पैशांचे नियोजन कसे करावे, याबाबत जगाला कळाले.त्यामुळे भावनिक खर्चाला आळा घातला पाहिजे, असा कानमंत्र देत (PCMC) आपला यशस्वी प्रवासही त्यांनी कथन केला.

Chakan : बंधाऱ्यावरील लोखंडी ढापे चोरीला

व्यवस्थापन सल्लागार अनिरुद्ध मोडक यांनी देखील आपले अनुभव कथन केले. तरुणांनी आपली क्षमता ओळखून उद्योग क्षेत्रात पाऊल टाका. मला हे जमणारच नाही, या शब्दांचा आपल्या जिवनात शिरकाव होणार नाही, याची काळजी घ्या. घाबरून न जाता जोखीम पत्कारायला शिका. अन्यथा तुमची संधी हिसकवायला अनेक जण रांगेत उभे आहेत. फॅशन, इनोव्हेशन, नेतृत्व, वित्त व्यवस्थापन, मूल्य प्रणाली, चांगले चरित्र, जोखीम या गोष्टींचा जिवनात अवलंब केल्यास यश नक्की मिळेल, असे मत व्यक्त करत त्यांचा आजवरचा प्रवास देखील त्यांनी उलगडला.

ऑटो क्लस्टरचे व्यवस्थापकीय संचालक किरण वैद्य यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. तसेच, ऑटो क्लस्टरद्वारे देण्यात येणा-या सुविधांची माहिती दिली. दरम्यान, गणेश थोरात, मिहीर केदार आणि सौदागर बर्डे यांच्या स्टार्टअपचे सादरीकरण करण्यात आले. तसेच, मान्यवरांनी नव स्टार्टअपला उदभवणा-या प्रश्नांची उत्तरे देवून प्रोत्साहित केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पुणे आकाशवाणीचे संजय भुजबळ यांनी केले. 

कौशल्य प्रशिक्षणावर भर

वैविध्यपूर्ण औद्योगिक क्षेत्र, भरभराट होत असलेले उत्पादन क्षेत्र, आर्थिक स्थिरता व त्याच्या वाढीसाठी मजबूत पाया पिंपरी चिंचवडने रोवला आहे. राष्ट्रीय–आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक छोटया-मोठया उद्योगांकडून उत्पादन निर्मिती आणि सेवा देण्याचे काम या ठिकाणी सूरू आहे. औद्योगिक सामाजिक उत्तरदायित्व (सी.एस.आर.), उद्योग कक्ष, कौशल्य विकास कार्यक्रमांमध्ये नाविन्यपूर्ण बदल, उत्पादनभिमुख प्रशिक्षण योजना, स्कील डेव्हलपमेंट सेंटर, प्रशासकीय प्रशिक्षण केंद्रांद्वारे कौशल्य प्रशिक्षणावर भर दिला जात आहे. यातून शहर आणि संपूर्ण राष्ट्र या दोघांचेही उज्वल भविष्य घडेल, असे उद्दिष्टये डोळयासमोर ठेवून शहर विकासाचे लक्ष्य गाठण्याचा आमचा मानस असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी (PCMC) सांगितले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.