Bhosari : एस पि जी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – दिनांक 5 सप्टेंबर रोजी एस पि जी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये (Bhosari) शिक्षक दिन उत्साहात साजरा झाला.या दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये विविध  कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या सोहळ्यानिमित्त  वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते.

यावेळी बोलताना वसंत हंकारे म्हणाले, शिक्षकांनी प्रामाणिकपणे तसेच  सचोटीने व चिकाटीने आपले काम करावे. त्याचबरोबर आपण ज्या शाळेत काम करतो तिला स्वत:ची शाळा समजावे. शाळेत एकत्र कुटुंबाप्रमाणे कोणतेही वाद विवाद न करता रहावे.  आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलाप्रमाणे वागवावे.

PCMC : उद्योजकतेला पोषक वातावरण निर्मितीसाठी पिंपरी-चिंचवड एक ‘व्यासपीठ’ – शेखर सिंह

या कार्यक्रमासाठी शाळेचे संस्थापक श्री. पांडुरंग नाना गवळी, सौ सुनितामाई गवळी, श्री नितीन लोणारी, सौ सविता लोणारी उपस्थित होते. प्रविण गायकवाड (मुख्याध्यापक) आणि सौ पूनम शिरसाट (मुख्याध्यापक) यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

EDAC Publication मधील नम्रता संघवी व मोनिका देसाई यांनी सर्व मान्यवरांचा, तसेच मुख्याध्यापक व शिक्षकांचा सत्कार केला. शाळेच्या इतर शाखेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली. ‘वंदे मातरम’ गाऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.