PCMC : गवांगझू अवॉर्डच्या शहरी इनोव्हेशन फायनलिस्टमध्ये पिंपरी-चिंचवडचा समावेश

एमपीसी न्यूज –  सहाव्या ग्वांगझू इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर अर्बन इनोव्हेशनच्या (ग्वांगझू अवॉर्ड) 15 अंतिम शहरांच्या (PCMC) यादीत पिंपरी चिंचवड शहराचा समावेश करण्यात आला आहे. “ग्वांगझू अवॉर्ड” साठी भारतीय शहरांमधून पिंपरी-चिंचवड हे एकमेव शहर ठरले आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली आहे.

सन 2012 पासून सिटी ऑफ ग्वांगझू, युसीएलजी आणि मेट्रोपोलिसद्वारे सह-प्रायोजित शहरी नवोपक्रमासाठी ग्वांगझू इंटरनॅशनल अवॉर्ड (Guangzhou Award) देण्यात येत आहे. ज्ञान निर्मितीला चालना देण्यासाठी आणि शहरी नावीन्यतेमध्ये शिक्षण सुलभ करण्यासाठी जागतिक व्यासपीठ म्हणून ही संकल्पना उदयास आली आहे.

गेल्या पाच टप्प्यांमधून जगभरात 1300 हून अधिक उपक्रम सादर करण्यात आले आहेत. परिवर्तनशील शहरी विकास पद्धतींना यामधून प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यात येत आहे. या उपक्रमात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने देखील सहभाग नोंदविला होता.

भारतातून पिंपरी चिंचवड हे एकमेव शहर आहे. तसेच, अंतल्या (तुर्किये), बोगोटा (कोलंबिया), केप टाउन (दक्षिण आफ्रिका), ग्वांगजू (कोरिया), हलांद्री (ग्रीस), इज्तापालापा (मेक्सिको), जकार्ता (इंडोनेशिया), कंपाला (युगांडा), कझान (रशिया), मॅनहाइम (जर्मनी), रामल्लाह (पॅलेस्टाईन) साओ पाउलो (ब्राझील), तेहरान (इराण) आणि झियानिंग (चीन) ही सर्व शहरे जगभरातील शहरी नवकल्पनांचे प्रतिनिधित्व करीत आहेत.

Maharashtra : छत्रपती संभाजीनगर, धाराशिव महसुली विभाग नामकरण फलकांचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

54 देशांमधील 193 शहरे आणि प्रदेशांमधील तब्बल 274 उपक्रमांनी ग्वांगझू पुरस्काराच्या 6 व्या फेरीसाठी अर्ज सादर केले (PCMC) होते. यामध्ये पिंपरी चिंचवड शहराची निवड खूप महत्त्वाची ठरली आहे. पुरस्कार प्रक्रीयेतील सादरीकरण मूल्यांकनासाठी 11 ते 14  सप्टेंबर 2023 या कालावधीत ग्वांगझू लायब्ररीमध्ये आंतरराष्ट्रीय तज्ञांचा समावेश असलेली एक प्रतिष्ठित तांत्रिक समिती बोलावण्यात आली होती.

समितीमार्फत शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs), न्यू अर्बन अजेंडा (NUA) च्या स्थानिक अंमलबजावणीच्या पाठपुराव्याशी संबंधित बाबींची पडताळणी करण्यात आली. यामध्ये, निवड प्रक्रिया, नवकल्पना, परिणामकारकता, संदर्भ आणि प्रतिकृती यासारख्या निकषांची करण्यात आला होता. यातून निवड झालेल्या 45पात्र उपक्रमांपैकी अंतिम १५15 शहरांमध्ये पिंपरी चिंचवडचा समावेश करण्यात आला आहे.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, आंतरराष्ट्रीय स्तरावरील मिळालेले हे यश पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी ही एक गौरवाची बाब आहे. पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचा सहभाग हे नाविन्यपूर्ण शहरी उपायांबद्दलचे समर्पण प्रतिबिंबित दर्शविते. आमचे अनुभव जगासोबत मांडण्यासाठी आम्ही कटीबध्द असून त्याचा सन्मान होणे आवश्यक आहे. विकास आणि शहराची प्रगती पुढे नेण्यासाठी वचनबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.