NCP : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शहराध्यक्षपदी तुषार कामठे

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या  (NCP) पिंपरी- चिंचवड शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक तुषार कामठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सिम्बीओसिस कॉलेज पुणे येथे राष्ट्रवादी इंजिनिर्स सेलच्या उदघाटनप्रसंगी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते कामठे यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

यावेळी पुणे शहारध्यक्ष प्रशांत जगताप, विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, अजय शितोळे, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, माजी नगरसेविका सुलक्षणा धर, संतोष कोकणे, संजय नेवाळे, काशिनाथ जगताप, काशिनाथ नखाते, प्रशांत सपकाळ, सामाजिक न्याय अध्यक्ष मयूर जाधव, देवेंद्र तायडे, राजन नायर, मुख्य प्रवक्ते माधव पाटील, महेश इंगवले, अमित लांडगे, योगेश कामठे, संतोष कामठे, तेजस शिंदे, महेश कामठे, राहुल कामठे, प्रतीक दळवी, सौरभ गाते, संजीवनी पुराणिक आदी उपस्थित होते.

PCMC : गवांगझू अवॉर्डच्या शहरी इनोव्हेशन फायनलिस्टमध्ये पिंपरी-चिंचवडचा समावेश

आमदार रोहित पवार, आमदार प्राजक्त तनपुरे, जयदेव गायकवाड,युवकचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांच्यासोबत जोमाने काम (NCP) करू असे नवनिर्वाचित अध्यक्ष तुषार कामठे म्हणाले. दरम्यान, कामठे हे 2017 च्या महापालिका निवडणुकीत पिंपळेनिलख मधून भाजपकडून नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

त्यांनी भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पक्षातील फुटीनंतर त्यांनी शरद पवार यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला. आता त्यांच्या गळ्यात शहराध्यक्षपदाची माळ पडली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.