Wakad Potholes: डीकॅथलॉन मॉल ते ताथवडे गावठाण रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरीक त्रस्त

एमपीसी न्यूज: डीकॅथलॉन मॉल ते ताथवडे गावठाण रस्त्यावरील खड्ड्यांमुळे येथून प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना त्रास  सहन करावा लागत आहे. (Wakad Potholes) या रस्त्याचे काम गेली 2 वर्षे चालू आहे मात्र अद्याप रस्ता पूर्ण झालेला नाही.

डीकॅथलॉन मॉल ते ताथवडे गावठाण रस्ता याला गाडा रस्ता देखील म्हणतात. हा रस्ता पुणे -बेंगलुरू वरील डीकॅथलॉन  मॉल पासून सूरू होऊन सांगवी -किवळे बीआरटीएस रोड ला जोडतो. (Wakad Potholes) त्यामुळे हा ताथवडे गावातील एक महत्वाचा रस्ता आहे. डीकॅथलॉन मॉल ते ताथवडे गावठाण रस्ता याला गाडा रस्ता देखील म्हणतात. आमच्या सोसायटी मधील 900 फ्लॅट मधील सुमारे 5,000 नागरिकांना या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दररोज त्रास सहन करावा लागतो.आमच्या सारख्या अनेक सोसायट्यांना हा रस्ता सांगवी – किवळे  बीआरटीएस रोड ला जाण्यासाठी शॉर्ट कट रोड आहे असं प्रवीण फराड, चिटणीस अक्षर इलेमेंटा हौसिंग सोसायटी यांनी एमपीसी न्यूजशी बोलताना सांगितलं.

ते पुढे म्हणाले की ह्या रस्त्याचे काम गेली 2 वर्षे चालू आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचते व रस्ता चिखलमय होऊन निसरडा होतो. मंगेश वाघमारे, ऑस्टीन पार्क हौसिंग सोसायटी मधील नागरिक म्हणाले की,पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अर्धा रस्ता विकसित केला आहे. (Wakad potholes) आमच्या सोसायटीच्या पुढे रस्ता विकसित केला नाही. आमच्या सोसायटीते 282 फ्लॅट्स आहेत. आमच्या सारख्या 12 हौसिंग सोसायटीमधील एकूण सुमारे 6,000 कुटुंबाना हा एकमेव रस्ता आहे बाहेर जाण्यासाठी. त्यामुळे सुमारे 30,000 नागरिकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतो.
potholes in city
ते पुढे म्हणाले की दुचाकीस्वारांना याचा खूप त्रास सहन करावा लागतो. दुचाकी घसरण्याचा धोका असतो. याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ड प्रभागाचे स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता विलास देसले म्हणाला की डीपी नुसार गाडा रस्त्याची एकूण लांबी 1 किलोमीटर 950 मीटर म्हणजेच सुमारे 2 किलोमीटर व रुंदी 24 मीटर आहे. त्यापैकी 1150 मीटर लांबीचा रस्ता पुर्ण आहे. तसेच उर्वरित रस्त्याची जागा ताब्यात नसल्यामुळे अद्याप काम झाले नाही. पावसामुळे तात्पुर्त्या स्वरूपात मनपा च्या वतीने मुरूम टाकून खड्डे बुझावण्यात आले आहेत. पावसाने दोन तीन दिवस उघड दिल्यास खड्ड्यांचे डांबरीकरण करून त्यांना बुझवण्यात येईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.