PCMC : इलेक्ट्रिक तीनचाकी वाहनांसाठी विशेष प्रोत्साहन योजना

एमपीसी न्यूज – पर्यावरणपूरक शहरी वाहतुकीच्या (PCMC)दिशेने सकारात्मक पाऊल टाकत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने इलेक्ट्रिक तीनचाकी वाहनांचा अवलंब करण्यासाठी विशेष प्रोत्साहन योजनेची घोषणा केली आहे.

या योजनेंतर्गत महापालिकेच्या वतीने इलेक्ट्रिक तीनचाकी वाहन मालकांना प्रती वाहन 30 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. या योजनेची जलद गतीने अंमलबजावणी करण्यासाठी रेट्रोफिटींग करणाऱ्या पहिल्या 1000 अर्जदारांना प्राधान्य दिले जाणार आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या तीनचाकी वाहनांसाठी 750 अर्जदार आणि शहरी मालवाहतूक करणाऱ्या तीन-चाकी वाहनांसाठी 250 अर्जदार निश्चित केले जाणार आहेत.

31 डिसेंबर 2015 नंतर खरेदी केलेल्या तीनचाकी (PCMC)वाहनांमध्ये प्रमाणित इलेक्ट्रिक कन्व्हर्जन किट (जुन्या तीनचाकी वाहनांमध्ये नवीन इलेक्ट्रिक उपकरणे) बसविलेल्या वाहनांचे मालक या योजनेसाठी पात्र असतील. जुन्या तीनचाकी वाहनांमध्ये बसविलेले हे किट्स ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया किंवा इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमेशन टेक्नॉलॉजी सारख्या प्रतिष्ठित संस्थांद्वारे मान्यताप्राप्त असावेत.

आयुक्त शेखर सिंह या योजनेबाबत बोलताना म्हणाले, शहरात प्रदूषणविरहीत पर्यावरणपूरक वातावरण निर्मिती करण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. यासाठी शहरातील ई-वाहनांच्या संख्येवर भर देणे गरजेचे आहे.  शहरातील एकूण तीनचाकी वाहनांपैकी किमान 50 टक्के तीन चाकी वाहने ही इलेक्ट्रिक असावीत असे महापालिकेने लक्ष्य ठेवले आहे. सीएनजी ते इलेक्ट्रिक ऑटोरिक्षा हा बदल शक्य तितका सुलभ आणि किफायतशीर करण्यासाठी ऑटो-मालकांना महानगरपालिकेच्या वतीने पुर्ण सहकार्य लाभणार आहे.

Moshi : संरक्षण उद्योगांना चालना देण्यासाठी नवे धोरण आणणार – देवेंद्र फडणवीस
पात्र अर्जदारांनी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध ऑनलाइन अर्ज भरणे आवश्यक असून त्यानंतर नियुक्त केलेल्या ड्रॉप-ऑफ ठिकाणी आवश्यक कागदपत्रांसह एक भौतिक प्रत जमा करणे आवश्यक आहे. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर महापालिका प्रशासन या प्रक्रियेत पारदर्शकता आणि कार्यक्षमतेची खात्री करून, थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये रकमेचे वितरण करणार आहे. तसेच या प्रक्रियेत फसव्या पद्धतींना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जाणार आहेत. यामध्ये चुकीची अथवा अपुर्ण माहिती आढळल्यास अर्ज त्वरित नाकारले जातील.

प्रोत्साहन योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया

– अर्जदारांनी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध ऑनलाइन फॉर्म भरावा.
– महापालिकेच्या वतीने अर्जामध्ये प्रदान केलेल्या सर्व तपशीलांची पडताळणी केली जाईल.
– अर्जदारांनी अर्जावर त्यांच्या बँक खात्याचा तपशील देणे आवश्यक आहे.
– पडताळणीनंतर, प्रोत्साहन रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया केली जाईल.
–  अर्जातील चुकीची माहिती किंवा अपूर्ण माहिती त्वरित नाकारली जाईल.
– अर्जात त्रुटी आढळल्यास अर्जदारांना त्यानुसार सूचित केले जाईल.
–  प्रत्येक अर्जदाराला युनिक आयडेंटिफिकेशन नंबर दिला जाईल.
– या नंबरद्वारे अर्जदाराला त्यांच्या अर्जाची स्थिती ट्रॅक करण्यास मदत होईल.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.