Talegaon Dabhade : लॅटिस हाऊसिंग सोसायटीमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे शहर आणि पंचक्रोशीत (Talegaon Dabhade)आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध असलेल्या लॅटिस हाऊसिंग सोसायटीमध्ये लॅटिस परिवार उत्सव समितीच्या वतीने शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. किल्ले तिकोना गड येथून सदानंद मोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणेलेल्या शिवज्योतीचे स्वागत करण्यात आले. 
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करून पूजन (Talegaon Dabhade)व शिवज्योत आणणारे शिलेदार तसेच मान्यवरांच्या हस्ते महाराजांची आरती करण्यात आली. सोसायटीमधील मुला मुलींच्या कलेला वाव देण्यासाठी चित्रकला, हस्तकला  कारवीग अशा विविध प्रकारच्या वस्तूंचे कला प्रदर्शन भरवण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन अभिमन्यू कुटे यांनी केले. प्रदर्शनाची जबाबदारी श्री व सौ दिनेशा गावडे यांनी घेतली. गावडे दांपत्याने स्वतः प्रदर्शनात वारली पेंटिंगच्या आधारे संपूर्ण रामायण साकारले होते.
सोसायटीमधील रामराज्य ढोल पथकाच्या वादनाने भव्य ऐतिहासिक शिवशाही पारंपारिक वेशभूषेत छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी व घोड्यावर जिवंत भव्य मिरवणूक प्रदक्षिणा करण्यात आली. यानंतर सोसायटीमधील दुर्ग अभ्यासक शिवाजीराव काळे यांचे किल्ले शिवनेरी या विषयावर व्याख्यान झाले.
स्वराज्याची शपथ स्वराज्य तोरण हा नाट्यआविष्कार संपूर्ण उत्सवाचे आकर्षण ठरला. प्रसिद्ध कलादिग्दर्शक सुभाष शिरसाट यांनी जाणता राजा महानाट्यवर आधारित पंधरा दिवस अगोदर अथक परिश्रमाने रंगीत तालमीची पूर्वतयारी करून घेतली. यामध्ये 85 लहान मोठ्या कलाकारांनी सहभाग घेतला. त्याचबरोबर प्रथमच बैलगाडी घोडा नांगर याचा प्रभावी वापर करण्यात आला. यामध्ये मुलांचे नृत्य अविष्कार तसेच महिलांचा वेगळा नृत्य आविष्कार आकर्षक ठरला. स्वामी स्वप्निल नवले, अयोध्या भेगडे व अर्णव बोराडे यांनी साकारलेल्या भूमिका लक्षवेधी ठरल्या. यानंतर मान्यवरांच्या हस्ते महाराजांची आरती होऊन महाप्रसाद देण्यात आला.
शिवजयंती उत्सवाचे आयोजन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश भेगडे, उपाध्यक्ष विवेक ठाकूर, खजिनदार निरव पांचोली, कार्याध्यक्ष किशोर भेगडे, उद्योजक नितीन भेगडे, वैभव शिंदे, महेश तनपुरे, अमोल भेगडे, संग्राम दाभाडे यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन माजी नगरसेविका शुभांगी सुभाष शिरसाट यांनी केले.
स्वप्निल नवले संदीप ढवळे, वैभव महाजन, अमित देशपांडे, योगेश राऊत, सागर पवार, अतिश बोराडे, अभिजीत सोनवणे, राजन देवतळे, राजेंद्र पंडित, श्रीमंत भुसे, गोडसे,   शिवांक वडके, शुभम शिरसाट, सचिन खोलम्म, पराग लेले, कुणाल महंते, प्रीती महाजन, मानसी बोराडे, मिताली देशपांडे, ज्योती भेगडे, पूजा भेगडे, रंजना ठाकूर, आर्या देशपांडे, रूपाली देवतळे, मनाली वडके, काव्या मुधळकर, देवयानी लेले, सविता पालीवाल, पायल पांचोली, कांचन म्हणते, प्रणिती नवले, रेणुका डोंगरा, सौ गोडसे, सौ ढमढरे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता परिश्रम घेतले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.