Chakan: चाकणच्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर ?

एमपीसी न्यूज – चाकण नगरपरिषद हद्दीतील अनधिकृत बांधकामे पाडण्यात येणार असल्याची (Chakan)जोरदार चर्चा शहरात सुरु झाली आहे. चाकण पालिकेने वर्तमान पत्रांमध्ये  जाहीर नोटीस देऊन अनधिकृत इमारती निष्कासित करण्यात येऊन संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

 

त्यामुळे शहरातील शेकडो मालमत्ता धारकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. पालिकेने अचानक संपूर्ण शहरावर बुलडोझर फिरवण्याचा निर्णय का घेतला ? या बाबत चर्चेला तोंड फुटले आहे.

चाकण पालिकेने अचानकपणे घेतलेल्या या आक्रमक भूमिकेने शहरातील (Chakan)नागरिकांमधून वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जात आहे. या बाबत प्राप्त झालेल्या माहिती नुसार,  एका सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकार्यांनी पालिकेला दिलेल्या पत्राच्या अनुशंघाने अॅक्शन मोडवर आलेल्या पालिकेने हा कारवाईचा आसूड उगारला असल्याची बाब समोर आली आहे.

संपूर्ण शहराला वेठीस धरण्याचा प्रयत्न नेमका कोणता पक्ष आणि पदाधिकारी करत आहेत ? कुणाच्या सांगण्यावरून चाकणकर नागरिकांवर कारवाया प्रस्तावित करण्यात आल्या आहेत ? या बाबत शहरात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.  ऐन निवडणुकांच्या तोंडावर कोण शहरावर दबाव आणत आहेत ? असे अनेक प्रश्न  नागरिकांकडून विचारले जात आहेत. काही पक्ष आणि संघटना यांनी या बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Chinchwad: गजानन बाबर यांच्या जीवनचरित्राचे शरद पवार, संजय राऊत यांच्या हस्ते प्रकाशन  

दरम्यान काही राजकीय मंडळी एकमेकांचे उट्टे काढण्यासाठी पडद्यामागून सक्रीय झाली आहेत. शहरातील काही राजकीय लोकांनी अतिक्रमणे निष्कासित व्हावीत यासाठी नियोजनबद्ध पाठपुरावा सुरु आहे. मात्र यामध्ये सामान्य नागरिकांचे हाल होणार असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. चाकण पालिकेने घोषित केल्या प्रमाणे कारवाया केल्यास खूप मोठ्या प्रमाणावर निवासी घरांवर बुलडोझर फिरवावा लागले असे नागरिकांकडून बोलले जात आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.