Chakan: पाईट मध्ये दांडगाई ; अडवलेला रस्ता मोकळा होईना ;खेड तालुक्यात प्रशासन हतबल; दबावतंत्राचा वापर

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील ( जि. पुणे ) पाईट येथील जिल्हा परिषद मालकीचा (Chakan)ग्रामीण मार्ग -178 या रस्त्यावर गेले तीन दिवसांपासून दांडगाईने मुरमाचा ढीग ओतून करण्यात आलेला अडथळा काढण्यात महसूल,ग्रामपंचायत,पंचायत समिती सह जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांना अपयश आले आहे.

 

बांधकाम विभाग उपाअभियंता कचरे यांनी सांगितले की,मी वरिष्ठ पोलिस निरीक्षक,महाळुंगे पोलिस स्टेशन यांना पत्र दिले व ग्रामसेवक यांना रस्ता अडथळा काढण्यास सांगितले. मात्र त्यांना काही लोकांनी विरोध केला.

सलग दिवस जागेवर जेसीबी मशिन सह शाखा अभियंता जंबुकर यांना बरोबर घेऊन गेलो, मात्र तिथे काही लोकांनी विरोध केला; त्यामुळे रस्ता मोकळा करता आला नाही असे सांगितले. याबाबत नायब तहसीलदार जोगदंड यांचेशी संपर्क केला असता आम्ही पोलिसांना पत्र देणार असून पोलीस बंदोबस्त प्राप्त झाला की सरकारी रस्त्यातील अडथळा दूर करू असे सांगितले. त्यानंतर शुक्रवारी आणि  शनिवारी (दि. 24 फेब्रुवारी 2024) पुन्हा पोलीस बंदोबस्तात देखील सरकारी रस्ता मोकळा करण्यात आला नाही.

Dehu: अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

एकंदर खेड तालुक्यातील गुंडगिरी व थेट प्रशासनाला देखील दाद न देण्याचा प्रकार सुरू आहे. एरवी सरकारी कामात अडथळा म्हणून गुन्हे दाखल करण्याचे काम जे प्रशासन करते, ते साधा ग्रामीण मार्ग मोकळा करण्यासाठी तीन दिवस अज्ञात शक्तींच्या दबावाने हातावर हात ठेऊन बसले आहे. यामागे बड्या राजकीय मंडळींनी प्रचंड दबाव टाकला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

 

या घटनेने तालुक्यातील दहशत पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. या भागातील बाधित कुटुंबे जीव मुठीत धरून गावात वास्तव्य करत असून आमच्या जीवाला धोका असल्याचे सांगत आहेत.  

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.