PCMC : नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड यांना निलंबित करा; माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांची सीएम, डीसीएमकडे मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड हे पदाचा गैरवापर (PCMC ) करत आहेत. शेतकरी, विकसक, नागरिकांकडून पैसे मागत असल्याचा आरोप करत त्यांच्या गैरव्यवहाराची चौकशी करावी. त्यांना निलंबित करावे अथवा त्यांची बदली करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी शासनाकडे केली आहे.

Pune : मंथन फाउंडेशन तर्फे 250 वारांगणांना पूरक आहाराचे वितरण

याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. त्यात भोंडवे यांनी म्हटले आहे की, गायकवाड यांना चुकीच्या कामाबाबत विचारले असता सकारात्मक उत्तरे न देता अरेरावी करतात. कोणत्याही माजी नगरसेवकांना जुमानत नाहीत. विकास कामांना मंजुरी देण्यासाठी पैसे स्वीकारतात. मागील दीड वर्षात त्यांनी अमाप संपत्ती जमा केली आहे.

काही बिल्डरांना हाताशी धरून त्यांच्या विविध प्रकल्पात त्यांचे लागेबांधे आहेत. त्यांच्या कार्यालयात नेहमी निवडक बिल्डरांचा राबता असतो. कनिष्ठ अधिकाऱ्यांना दबाव टाकून पैसे वसूल करण्यास भाग पाडत आहेत. या विभागातील काही अधिकाऱ्यांना एसीबीने लाच स्वीकारताना पकडले आहे.

गायकवाड यांच्या भ्रष्टाचारी धोरणामुळे शहरातील अनेक विकास कामे ठप्प झाली आहेत. तसेच शेतकरी, बिल्डर आणि नागरिकांना पैशासाठी वेठीस धरत असल्याने शहरातील अनेक विकास कामांना खीळ बसली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान,  गायकवाड यांची बाजू येताच बातमीत ऍड केली (PCMC ) जाईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.