PCMC : विभागीय कार्यालयात कर भरण्याची सुविधा

एमपीसी न्यूज – मालमत्ता कर भरण्यासाठी 17 विभागीय कार्यालये असून ( PCMC )  विभागीय कार्यालये अन्य विभागीय कार्यालय परिसरातील मालमत्ता धारकांचा भरणा स्वीकारत नसल्याच्या तक्रारीची गंभीर दखल सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी घेतली. मालमत्ता धारक कोणत्याही विभागीय कार्यालयात कर भरण्यास आल्यास त्यांचा कर भरून घ्यावा, असे आदेश त्यांनी यांनी सर्व सहाय्यक मंडलाधिकाऱ्यांना दिले आहेत.

शहरात निवासी, बिगर निवासी, औद्योगिक, मिश्र, मोकळ्या जमीन अशा 5 लाख 98 हजार मालमत्ता आहेत. या मालमत्ता धारकांना महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाकडून कराची आकारणी करण्यात येत आहे. नागरिकांच्या दृष्टीने पालिकेने शहराच्या विविध भागात 17 विभागीय कर संकलन कार्यालय सुरू करण्यात आले आहेत.

Alandi : अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी तरुणाला अटक

अनेक नागरिक विविध ऍप, डीडी, धनादेशाव्दारे कराचा भरणा करतात. तर काही नागरिक विभागीय कार्यालयातील कॅश काऊंटरवर पैसे भरतात. मात्र, काही विभागीय कार्यालये अन्य विभागीय कार्यालय परिसरातील रहिवासी मालमत्ता धारकांचा भरणा स्विकारत नसल्याच्या तक्रारी कर संकलन व कर आकारणी विभागाकडे आल्या आहेत.

दिवसेंदिवस अशा प्रकारच्या तक्रारी वाढत असल्याने याची गंभीर दखल सहाय्यक आयुक्त देशमुख यांनी घेतली आहे. रोख व धनादेशाद्वारे मालमत्ता कराचा भरणा अन्य विभागीय कार्यालयाचा असला तरी तो स्वीकारण्यात यावा. भरणा न स्वीकारल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित विभागीय कार्यालयावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देशमुख यांनी ( PCMC ) दिला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.