Pimpri : ज्येष्ठ महिलेला मारहाण करत दिली धमकी

एमपीसी न्यूज – घराचा वाद न्यायालात सुरु (Pimpri) असतानाही घरावर ताबा मिळवण्यावरून ज्येष्ठ महिलेला  माराहाण करत तिच्या नातवाला जिवे मारण्याची धमकी दिली आहे. हा प्रकार बुधवारी (दि.24) सकाळी पिंपरीतील नेहरुनगर येथे घडला आहे.

याप्रकरणी 72 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन महिला आरोपी व सचिन संजय तहसिलदार (वय 33) व राहूल संजय तहसीलदार (वय 30) दोघे रा. पिंपरी यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

PCMC : विभागीय कार्यालयात कर भरण्याची सुविधा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,. फिर्यादी व आरोपी यांच्यात चाळीतील घरावरून न्यायालयात केस सुरु आहे. हे माहिती असताना देखील आरोपीने मजुरां करवी घराची कौले काढण्यास सुरुवात केली. यावेळी फिर्यादी यांनी हटकले असता फिर्यादीचा हात पिरगळून कौलाने मारहाण केली. तसेच फिर्यादी यांच्या नातवाला मारहाण केली. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील (Pimpri) तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.