PCMC: महापालिका सेवक पतसंस्था निवडणुकीसाठी उद्या मतदान, 3 हजार 739 कर्मचारी मतदानाचा हक्क बजाविणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका सेवकांची (PCMC) सहकारी पतसंस्था पंचवार्षिक निवडणूक उद्या (मंगळवारी) होणार आहे. चार पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 3 हजार 739 कर्मचारी मतदानाचा हक्क बजाविणार आहेत.

महापालिका भवनात मंगळवारी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. स्व. शंकरअण्णा गावडे कर्मचारी महासंघ, आपला महासंघ, ओम चैतन्य गगणगिरी पॅनेल आणि शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच असे चार पॅनेल आहेत.

पतसंस्थेच्या 19 जागांसाठी 54 उमेदवार रिंगणात आहेत. 14 जागा सर्वसाधारण, 2 जागा महिलांसाठी आणि अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय व भटक्या विमुक्त जाती-जमातींसाठी प्रत्येकी 1 जागा राखीव आहेत. मंगळवारी मतदान झाल्यानंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

Pune : मंत्र्याचे जरी अतिक्रमण असेल, तर ते पाडलेच पाहिजे – चंद्रकांत पाटील

3 हजार 739 कर्मचारी मतदानाचा हक्क बजाविणार

पतसंस्थेच्या 19 जागांसाठी 54 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत 3 हजार 739 कर्मचारी मतदानाचा आपला हक्क बजाविणार आहेत. मतदानासाठी कर्मचाऱ्यांना सवलत देण्यात यावी, अशी (PCMC) मागणी महापालिका सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे केली होती.

त्यानुसार मतदानासाठी कर्मचाऱ्यांना सवलत देण्यात येणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी, कर्तव्य, अत्यावश्‍यक सेवेत कोणताही अडथळा, विस्कळीतपणा येणार नाही, याची दक्षता घेणे आवश्‍यक असल्याचे परिपत्रकात अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.