PCMC : महापालिकेत 54 अधिकारी, कर्मचा-यांना बढत्या; आता बदल्या कधी?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त तथा (PCMC) प्रशासक शेखर सिंह यांनी 54 अधिकारी, कर्मचा-यांना बढत्या दिल्या आहेत. त्यात सह आयुक्त, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, लेखापाल, उपलेखापाल यांचा समावेश आहे. बढत्या झाल्यामुळे बदल्या कधी होणार याकडे कर्मचा-यांचे लक्ष्य लागले आहे.  याबाबतचे आदेश सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी मंगळवारी रात्री उशिरा काढले.

पिंपरी महापालिका पद्दोन्नती समितीची 24 एप्रिल 2023 रोजी बैठक झाली. या सभेत सेवा ज्येष्ठतेनुसार बढत्या देण्यात आल्या आहेत. उपायुक्त चंद्रकांत इंदलकर यांना सहआयुक्तपदी बढती दिली आहे. त्याचबरोबर अशोक आडसुळे, वासुदेव मांढरे, अनुश्री कुंभार, अकबर शेख यांना कार्यकारी अभियंता (विद्युत) पदी बढती देण्यात आली आहे.

India News : तामिळनाडूच्या नंदिनीला बारावीत 100 टक्के

आरोग्य निरीक्षकपदी 2, आरेखकपदी 2, विद्युत पर्यवेक्षकपदी 10 , उद्यान सहाय्यकपदी 9 , उपलेखापालपदी 16,  लेखापालपदी 1, असिस्टंट मेट्रन पदी 1, मेट्रनपदी 1 आणि उपअभियंतापदी 4 जणांना बढती देण्यात आली आहे.

बढत्या झाल्या, आता बदल्या कधी?

दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात अंतर्गत बदल्या केल्या जातात. मागील दोन वर्षे कोरोनामुळे बदल्या झाल्या नव्हत्या. यंदा बदल्या केल्या जाणार आहेत. विभागप्रमुखांच्या बदल्या केल्यानंतर  कर्मचा-यांच्या बदल्या केल्या जातील असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. आता बढत्या झाल्या असून बदल्या कधी होणार याची कर्मचा-यांना उत्स्कुता (PCMC) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.