Pimpri: शहरात पुढील चार रात्री औषध फवारणी; नागरीकांनी घराबाहेर पडू नये

फवारणीच्या कामात व्यत्यय आणू नये, महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे विविध उपाययोजना केल्या जात असून उद्यापासून पुढील चार रात्री संपूर्ण शहरात औषध फवारणी केली जाणार आहे. सात अग्निशामक वाहनांनाद्वारे रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत औषध फवारणी करण्यात येणार आहे. नागरीकांनी घराबाहेर पडू नये, फवारणीच्या कामात व्यत्यय आणू नये असे आवाहन महापालिकेने केले आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे विविध सामाजिक, स्वयंसेवी संस्था, खासगी संघटना यांच्याकडून औषध फवारणी करण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार आरोग्य विभाग आणि अग्निशामक विभाग यांच्या वतीने मोहीम राबविण्यात येणार आहे.

सात अग्निशामक वाहनांनाद्वारे संपूर्ण शहरात रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत औषध फवारणी करण्यात येणार आहे. शहरात लॉकडाऊन आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये. फवारणीच्या कामात व्यत्यय आणू नये असे आवाहन महापालिकेने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.