Wakad : ट्रॅव्हल्सच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – ट्रॅव्हल्सच्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. हा अपघात डांगे चौक येथे शुक्रवारी (दि. 30) रात्री घडला.

Alandi : सोबत रहात नाही म्हणून महिलेला मारहाण करणाऱ्या माथेफिरुला अटक

ट्रॅव्हल्स चालक प्रविम शांताराम सोनवणे (वय 42, रा, अमळनेर, जळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक सुनील काटे यांनी वाकड (Wakad) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा त्याच्या ताब्यातील ट्रॅव्हल्स (एमएच 46/एएच 0149) घेऊन जात असताना त्याच्या ताब्यातील ट्रॅव्हल्स बेदरकारपणे चालवत त्याने पायी जाणाऱ्या 40 वर्षीय इसमाला धडक दिली. यात त्याचा मृत्यू झाला. मात्र मयताची अद्याप ओळख पटलेली नाही. वाकड (Wakad) पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.