Alandi : सोबत रहात नाही म्हणून महिलेला मारहाण करणाऱ्या माथेफिरुला अटक

एमपीसी न्यूज –  तू माझ्या सोबत का रहात नाही म्हणून महिलेला बेदम मारहाण केली. याप्रकरणी एकास पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 29 जून रोजी दुपारी आळंदी (Alandi) येथे घडली.

Bhosari : किरकोळ कारणावरून टोळक्याकडून कुटुंबीयांना मारहाण

याप्रकऱणी महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 1) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विनोद प्रल्हाद चव्हाण (रा. यवतमाळ) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांच्या तोंडओळखीचा आहे. त्याने फिर्यादीला ‘तू माझ्या सोबत का रहात नाही’ म्हणत चिडून हाताने लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तुझ्याकडे बघतोच अशी धमकी देत हातातील लोंखडी कडे फिर्यादीच्या तोंडावर मारले. यात फिर्यादी यांच्या चेहऱ्यावर, डोळ्यावर, कानावर, कपाळावर दुखापत झाली. आळंदी (Alandi) पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.