Pimpri : रस्त्यावर फिरणाऱ्या गोवंशाची कायमस्वरुपी व्यवस्था करा; अन्यथा तीव्र आंदोलन

एमपीसी न्यूज – शहरातील भटक्या जनावरांची व्यवस्था करण्यासाठी जागेची लवकरात लवकर उपलब्ध करुन भटकत्या गोवंशाची कायमस्वरुपी व्यवस्था करावी, असे निवेदन विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या वतीने महानगरपालिका आयुक्तांना दिले. अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशाराही देण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

भटक्या मोकाट गोवंश बऱ्याच रहदारीच्या ठिकाणी रस्त्यात व चौकात थांबत असल्याने वाहतुकीला अडचण होऊन नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागते आहे. तसेच वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून या अपघातात नागरिक व गोवंशही जखमी होतात. तसेच शहरातील नागरिक गोवंशांना खाद्यपदार्थ भर रस्त्यात खायला घालत असल्यामुळे शहरातील रस्त्यावर त्याचे कचऱ्यात रुपांतर होऊन “स्वच्छ भारत” या अभियानाची ऐशीतैशी होत आहे.

शिवाय या गोवंशांची कसायांकडून कत्तलीसाठी चोऱ्या होत आहेत. याबाबत पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आले आहे. पुढे जाऊन यामुळे हिंदू-मुस्लीम दंगल भडकल्यास याला पुर्णतः जबाबदार महानगरपालिका प्रशासन राहील. या सर्व गोष्टींचा विचार ‘करून मोकाट फिरणाऱ्या गोवंशांची कायमस्वरुपी व्यवस्था करण्यात यावी. रस्त्यावर फिरणाऱ्या गोवंशांची व्यवस्था पाच दिवसात केली नाहीतर सहाव्या दिवशी विश्व हिंदू परिषद, बजरंग दलवतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.