Kalewadi News: फुलकळी यादव यांचे निधन

एमपीसी न्यूज – काळेवाडी येथील फुलकळी रोशनलाल यादव (वय 80) यांचे आज (शनिवारी) सकाळी साडे पाच वाजता यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. पिंपरी येथील स्मशानभूमीत सकाळी अकरा वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यांच्या मागे दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार संतलाल यादव यांच्या त्या आई आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.