Pimple Gurav : सावित्रीच्या लेकींचा मंच स्थापन

एमपीसी न्यूज – महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून पिंपळे गुरव येथे सावित्रीच्या लेकींचा मंचची स्थापना करून महिलांचे प्रबोधन करण्यात आले.
यावेळी रविना आंगोलकर, मधुश्री ओव्हाळ, मालती लोखंडे, मीरा कंक प्रमुख अतिथी होत्या. यावेळी जयश्री गुमास्ते, स्टेला गायकवाड, राजश्री कदम, जोत्स्ना लोखंडे, पंचशीला शिंदे, सुकेशना निंबाळकर, कवी शाम सरकाळे, दिलीप ओव्हाळ, निशिकांत गुमास्ते आदी उपस्थित होते.

  • “रंगुबाई गं गंगुबाई, तुम्हा जगायचा नव्हता मान, ज्योतिबा फुले सावित्री फुले यांनी राखली तुमची शान…” कवी देवेंद्र गावंडे यांच्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सहा वर्षाची बालिका ओवी मिलिंद कंक अर्थात उद्याची सावित्री हिच्या हस्ते सावित्रीच्या लेकींचा मंच फलकाचे उदघाटन करण्यात आले
मंचाच्या उपाध्यक्ष मधुश्री ओव्हाळ यावेळी म्हणाल्या, “सावित्रीच्या लेकींचा मंच पिंपरी चिंचवड शहरात प्रामुख्याने महिलांच्या विविध समस्यांवर काम करणार आहे. महिलांना सक्षम बनविणे, लघुउद्योग निर्मिती, परिसंवाद, कविसंमेलन ,स्रियांच्या आजारावर माहिती शिबिरे यासारखे समाजोपयोगी उपक्रम पुढील काळात घेण्यात येणार आहेत त्यासाठी शहरातील कार्यक्षम महिलांचा समावेश मंच विस्तारात करणार आहोत”
  • परिसरातील महिला भगिनी यांच्या उपस्थितीने आणि सहभागाने उदघाटन सोहळा रंगतदार झाला. सूत्रसंचलन सुरेश कंक यांनी केले तर आभार चैताली चव्हाण यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.