Pimple Gurav : पिंपळेगुरवला रंगणार अनोखे कवीसंमेलन

एमपीसी न्यूज – शब्दधन काव्यमंचच्यावतीने थंडीत कवितेचे उब देणारे अनोखे कवीसंमेलन पिंपळे गुरव येथे होणार आहे, अशी माहिती शब्दधन काव्यमंचचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी दिली.

मस्त थंडी वाफाळलेला चहा आणि सोबत कविता यांची सुरेल मैफल गुरुवार (दि. 20 डिसेंबरला) सकाळी साडेसहा वाजता पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालयाशेजारी होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समरसता साहित्य़ परिषदेचे कार्यवाह कवी सुहास घुमरे असणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी प्रदीप गांधलीकर, नगरसेवक सागर आंगोळकर, महेश जगताप आदी उपस्थित राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.